03 March 2021

News Flash

पिंपरीला ‘कचरामुक्त शहर’ करण्याचा प्रयत्न करू

प्रत्येकाने शहर स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.

आयुक्त दिनेश वाघमारे यांची ग्वाही

पिंपरी-चिंचवड शहराला कचरामुक्त शहर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य गरजेचे आहे, असे मत आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

िपपरी महापालिका व सायन्स पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या विविध संस्था तसेच व्यक्तींचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुक्त वाघमारे म्हणाले, हवा, पाणी, माती या पर्यावरणपूरक बाबींचे जतन करून भावी पिढीला नैसर्गिक स्रोत उपलब्ध व्हावा. शहरातील कचरा वर्गीकरण करणाऱ्या मुला-मुलींचा विचार व्हावा. प्रत्येकाने शहर स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.

पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, शहरातील कचरा समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने अनेक योजना राबवल्या आहेत. याकामी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुथियान आणि लक्ष्मीकांत भावसार यांनी केले. प्रवीण लडकत यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 3:06 am

Web Title: we are trying to do pimpri waste free city
Next Stories
1 पिंपरीत पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत
2 बाजार समितीतील वादग्रस्त प्रकरणांची फेरचौकशी होणार
3 वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त
Just Now!
X