भाजपाने पाच वर्ष आश्वासन देऊनही सत्तेपासून आम्हाला दूर ठेवले आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे अन्याय दूर करायचा असेल, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले पाहिजे अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

ते विधान परिषद आमदार आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी आमचं शिष्टमंडळ लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात शिवसंग्राम पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसंग्रामच्या आमदारांसह राज्यभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर विनायक मेटे यांनी पत्रकाराशी संवाद साधला.