04 December 2020

News Flash

कंगनाचं समर्थन करण्याच्या मुद्यावर प्रविण दरेकर म्हणाले…

कंगनाचं कार्यालय तोडण्याचं काय कारण होतं?

मुंबईच्या विरोधात कोणी बोललं तर त्याला आमचा पाठिंबा नाही. कंगनाच्या चुकीच्या गोष्टींच आम्ही अजिबात समर्थन करणार नाही असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

कंगनाचं कार्यालय तोडण्याचं काय कारण होतं? तुमच्या विरोधात बोललं की बांधकाम तोडणार त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे असे दरेकर म्हणाले. उद्या पत्रकारांने एखादी भूमिका माडंली ती तुम्हाला पटली नाही म्हणून त्याला जेलमध्ये टाकणार का? असा सवाल दरेकर यांनी केला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. कंगनाच्या चुकीच्या भूमिकांच कधीच समर्थन करणार नाही. पण सत्तेचा वापर करुन तुम्ही दबाव आणणार असाल, तर त्या विरोधात आम्ही लढणार असे दरेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:11 pm

Web Title: we will not support kangna ranaut wrong opinions pravin darekar svk 88 dmp 82
Next Stories
1 शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठीच अंतिम वर्षांच्या परीक्षांचे आयोजन
2 पुणे पदवीधर, शिक्षक मतदानासाठी नऊ प्रकारची कागदपत्रे ग्राह्य़
3 राज्यभरात घरखरेदीची दिवाळी!
Just Now!
X