पुणे : आपल्या बुलंद शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात सर्वसामान्यांमध्ये चेतना जागृत करणारे, शोषित आणि कष्टकऱ्यांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे यांच्याविषयी जाणून घ्यायचे असल्यास नव्या पिढीला संगणकाची एक कळ दाबताच माहिती उपलब्ध होऊ  शकत नाही. मात्र ही अडचण आता दूर होणार असून कॅटलिस्ट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्यावरील संकेतस्थळ निर्मितीचा संकल्प केला आहे.

आपल्या अलौकिक प्रतिभेतून कला आणि साहित्य विश्वात स्वत:ची वेगळी नाममुद्रा उमटविणारे अण्णा भाऊ  साठे यांची संपूर्ण माहिती आजही संकेतस्थळावर फारशी उपलब्ध नाही. म्हणूनच अण्णा भाऊंचे महान कार्य डिजिटल स्वरुपात जनतेसमोर आणण्याच्या उद्देशातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. अण्णा भाऊंचे अलौकिक व्यक्तिमत्त्व, त्यांची व्यापक साहित्य संपदा, स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील त्यांचे योगदान, लोकशाहीर म्हणून त्यांनी केलेले समाजप्रबोधन या विषयीची एकत्रित माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Unveiling of Ram Garjana song by MLA Sanjay Kelkar
लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

हे संकेतस्थळ सातत्याने अद्ययावत करण्यात येणार असून राज्य सरकारने प्रकाशित केलेले अण्णा भाऊंचे साहित्य त्यावर उपलब्ध असेल. त्यासाठी राज्य साहित्य संस्कृती मंडळाने फाउंडेशनला परवानगी दिली असल्याची माहिती फाउंडेशनच्या सचिव लक्ष्मीकांता माने यांनी दिली. नव्या काळाशी सुसंगत माध्यमामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे यांना स्थान देणाऱ्या या संकेतस्थळाचे अनावरण संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते लवकरच होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.