लाकडी पूल ते दगड-विटांचा पूल अशी वाटचाल

पुणे : पेशव्यांच्या शुक्रवार वाडय़ाच्या लाकडांपासून बनविलेला.. नंतरच्या काळात दगड-विटांच्या बांधकामाने पक्का केलेला.. १९७५ मध्ये पुन्हा एकदा नव्याने उभारलेला.. लाकडी पूल ते भक्कम बांधकामाने साकारलेला अशी वाटचाल झालेल्या मुळा-मुठा संगमावरील वेलस्ली पुलाने सोमवारी १९० व्या वर्षांत पदार्पण केले. १७ जून १८३० रोजी वेलस्ली पुलाचे उद्घाटन झाले होते. हा पूल साकारण्यासाठी त्याकाळी १ लाख १० हजार ९३० रुपये खर्च आला होता.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Tehsil Office Tehsildar Sachin Shankarlal Jaiswal of Sindkhedaraja arrested for accepting bribe
तहसीलदाराकडे सापडले तब्बल ४६ लाखांचे घबाड! लाच स्वीकारतांना अटक
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड

मुळा-मुठेचा संगम झालेला पूल म्हणून ज्याला आपण सारे संगम पूल या नावाने ओळखतो त्याचे मूळ नाव वेलस्ली पूल आहे. येरवडा परिसराचा पुणे शहराशी संपर्क जोडण्यासाठी १८३० मध्ये हा पूल साकारण्यात आला होता. पेशवाई बुडाल्यानंतर ब्रिटिशांनी पेशव्यांचा शुक्रवार वाडा पाडून टाकला आणि या वाडय़ाची लाकडे वापरून हा पूल साकारण्यात आला होता. टिपूचे राज्य बरखास्त करणारे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी ऑर्थर वेलस्ली यांचे नाव या पुलाला देण्यात आले, अशी माहिती जुन्या पुण्याच्या इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी दिली.

हा पूल उभारल्यानंतर ब्रिटिशांनी काही विद्वानांना दक्षिणा दिली असल्याचा उल्लेख आढळून येतो. गंमत म्हणजे त्या काळी पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वेलस्ली असे म्हणता येत नसायचे. त्यामुळे अपभ्रंश होत या पुलाचे ‘वेस्ली पूल’ असे लोकांनीच नामकरण केले होते, असे घाणेकर यांनी सांगितले.

पहिला लाकडी पूल काढून १८३९ मध्ये दगड-विटांचे बांधकाम करून नवा पूल बांधण्यात आला. जॉन माल्कम यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर १८७५ मध्ये कर्नल फिंच यांनी नव्याने या पुलाची उभारणी केली. फिलीप वुडहाऊस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ या पुलाच्या उभारणीची संगमरवरी कोनशिला उभारण्यात आली होती.

या पुलालाही आता १४० वर्षे झाली आहेत. मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर हा पूल असल्यामुळे या पुलाला संगम पूल असे म्हटले जाते. पुण्यातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या

उद्देशातून महापालिकेने संगम पुलाशेजारी आणखी एक नवा पूल उभारला आहे, असे घाणेकर यांनी सांगितले.