मोहन जोशी यांची देवेंद्र फडणवीस यांना विचारणा

पुणे : देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला विनामूल्य करोना प्रतिबंधक लस दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमावेळी दिले होते. त्याचा हवाला देत मोफत लस देण्याचे जाहीर भाषण करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोफत लस गेली कु ठे? हे सांगावे, अशी विचारणा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी के ली आहे.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोहन जोशी यांनी पत्र पाठविले आहे. देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला मोफत लस दिली जाईल आणि राज्यावर लसीकरणाचा कोणताही भार टाकण्यात येणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. सध्या लसीच्या कि मतीचा घोळ सुरू आहे. करोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने लस खरेदीची तयारी दर्शविली आहे. त्यानंतरही पंतप्रधानांच्या आश्वासनाचे पुढे काय झाले, हा प्रश्न कायम आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचे उत्तर देणे आवश्यक आहे, असे मोहन जोशी यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, लसीकरण हा राष्ट्रीय कार्यक्रम असून केंद्र सरकारने मोफत लस द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणाचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला खिळ बसली असल्याचेही जोशी यांनी निदर्शनास आणले आहे.