संवेदनशील अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी समर्थन केले असून संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी दिलेल्या प्रतिक्रिया या अभिनेते नसरुद्दीन शहा यांचं म्हणणं खरं करणाऱ्या असल्याचे दाखवून देत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी देशात गायीचा मृत्यू पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे म्हणत खंत व्यक्त केली होती.उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं होत.एवढंच नाही तर ‘देशातील हे वातावरण पाहता मला माझ्या मुलाची चिंता वाटते.कारण त्यांचा कोणता धर्म नाही. त्यांना धर्म विचारला तर ते काय उत्तर देतील? याची भीती वाटते असे म्हटले होते. यासंदर्भात प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी आपली भूमिका मांडली असून ते म्हणाले की,संघ परिवारातील संघटना आणि व्यक्तींनी शाह यांच्या वक्तव्यावर ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यावरुन शाह जे म्हटले आहेत ते योग्यच आहे हे सिद्ध होते आहे.

अजमेर येथे होणाऱ्या फेस्टिव्हल ला नसीरुद्दीन शाह जाणार असल्याने तिथल्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ,राडा,मारामारी केली. एवढेच नाही तर नसीरुद्दीन शाह यांच्या पोस्टरलाही काळे फासले व ते फाडले. हे प्रकार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करून नसीर यांची खंत बरोबर आहे हे वर्तनातूही दाखवून दिले आहे.