महापालिकेने विकसित केलेल्या सायकल मार्गांमध्ये सलगतेचा अभाव

पुणे : शहरातील खासगी वाहनांचे प्रमाण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत आराखडा करून महापालिके ने काही वर्षात सायकल मार्ग विकसित के ले असले तरी त्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे कु ठे गेले सायकल मार्ग, असे म्हणण्याची वेळ सायकलस्वारांवर आली आहे. जे सायकल मार्ग महापालिके ने विकसित के ले आहेत, त्यामध्येही सलगतेचा अभाव आहे. त्यामुळे सायकलस्वारांनाही सायकल मार्गांचा वापरच करता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सायकलींचे शहर ही पुण्याची ओळख जपण्यासाठी महापालिके ने काही वर्षांपूर्वी सायकल एकात्मिक आराखडा के ला. त्याअंतर्गत ४७० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले. स्वतंत्र सायकल विभागाची स्थापना,  सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्याशिवाय प्रचार आणि प्रसार, देखरेख आदी प्रमुख बाबींचा या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र या आराखड्यानुसार सायकल मार्गांचे जाळे उभारण्यात महापालिके ला अपयश आल्याचे चित्र आहे. सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट (एसपीटीएम) या संस्थेने के लेल्या सर्वेक्षणातूनही शहरात सायकल मार्ग कमी असल्याचे, अस्तित्वातील सायकल मार्गांमध्ये सलगतेचा आणि पायाभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. या कारणांमुळे सायकलस्वारांना सायकल मार्ग पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती असून अतिक्रमणे, अपुऱ्या सुविधा, सायकल मार्गांच्या अभावामुळे सायकल मार्गांचा अवघा दहा टक्के च वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोथरूड, कर्वेनगर, जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता येथील सहा ठिकाणी सलग चौदा दिवस सर्वेक्षण करण्यात आले. किती सायकलस्वार मार्गांचा वापर करतात, त्यांना कोणत्या अडचणी जाणवतात, किती सायकल स्वार मार्गांचा वापर करतात याची प्रत्यक्ष मोजणी सर्वेक्षणात करण्यात आली. या सर्वेक्षणातील अभ्यासातूनही कु ठे गेले सायकल मार्ग अशी विचारणा करण्याची वेळ सायकलस्वारांवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने गेल्या तीन वर्षात अवघे २५ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित केले आहेत. तर केंद्राच्या तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) ९० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग काही वर्षांपूर्वी विकसित करण्यात आले. त्यामुळे शहरात सद्य:स्थितीमध्ये ११५ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग आहेत. मात्र त्यातील अनेक सायकल मार्गांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी सायकल मार्गही के वळ नावालाच असून त्यावर अनेक अतिक्रमणे झाली आहेत. जिथे सायकल मार्ग आहेत, तिथे आराखड्यानुसार तो मार्ग पूर्ण करण्यात आलेला नाही. काही मीटर अंतराचेच सायकल मार्ग असल्याचे चित्र आहे.

आराखड्यात काय

महापालिकेच्या एकात्मिक आराखड्यानुसार शहरात ४७० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग विकसित करण्यात येणार आहेत. त्यातील १५४ किलोमीटर लांबीची मार्गिका रंगीत असेल. ७५ किलोमीटर लांबीचे ग्रीन-वे त्यामध्ये असतील. तर ९२ किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग नव्याने करण्याचे प्रस्तावित आहे. तर ५४ किलोमीटर लांबीच्या मार्गांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जेएनएनयूआरएमअंतर्गत विकसित झालेले आणि महापालिकेने आराखड्यानुसार विकसित केलेल्या एकूण मार्ग ११५ किलोमीटर लांबीचे आहेत. सध्या सायकलस्वारांची संख्या वाढली आहे. मात्र त्या तुलनेत त्यांना पुरेसे सायकल मार्गही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

सायकल मार्गामध्ये सलगता नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पायाभूत सुविधांचाही अभाव जाणवत आहे. त्यामुळे सायकलस्वारांनाही सायकल मार्गाचा वापर करण्यात अडचणी येत आहेत.

– हर्षद अभ्यंकर, संचालक,  एसपीटीएम