News Flash

राज्याचे विधिमंडळ प्राणिसंग्रहालय आहे का, अजित पवार यांचा खोचक सवाल

राज्यात तूर घोटाळा झाल्याचा आरोप

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्याचे विधिमंडळ हे प्राणिसंग्रहालय आहे का, असा सवाल उपस्थित करत राज्यात तूर घोटाळा झाला असून सरकार घोटाळेबाजांना पाठिशी घालत असल्याचा गंभीर आरोपही केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा सुरू झाली आहे. त्यावेळी ते बोलत होते. उंदीर, मांजर, वाघ, सिंह हे प्राणिसंग्रहालय आहे की विधिमंडळ, या सभागृहाला काही पावित्र्य आहे की नाही. ज्या ठिकाणी आपण कायदे तयार करतो, जेथून राज्याचा कारभार हाकला जातो, जेथून सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते. समाजातील वंचित वर्गाला पुढं कसं आणता येईल, हे ठरवले जाते, तिथे खुशाल प्राणिसंग्रहालय असल्यासारखी भाषणं दिली जातात, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात मोठा तूर घोटाळा झाला असून घोटाळेबाजांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोपही केला.

संभाजीराव निलंगेकर सरकारचे जावई आहेत का?: पवार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही त्यांनी भाजपावर टीका केली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. या संपूर्ण कालावधीत सताधारी पक्षाच्या मंत्र्यांनी चिक्की ते उंदीर घोटाळे करण्यावर भर दिला असून त्या घोटाळ्याचे पुढे काही झाली नाही. या प्रत्येक मंत्र्याचे घोटाळे बाहेर येताच त्या संबधित मंत्र्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने क्लीन चीट देतात, अशा शब्दात त्यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला होता. हे भाजपा सरकार म्हणजे घोटाळेबाज सरकार असल्याची टीका त्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 5:53 pm

Web Title: whether the state legislature is zoo ncp leader ajit pawar raises question
Next Stories
1 १६ तास उलटूनही मोशी कचरा डेपोची आग अनियंत्रितच
2 कुंपणानेच शेत खाल्ले: डिलिव्हरी बॉयनेच रचला सोन्याच्या बिस्किटांच्या चोरीचा बनाव
3 ‘चहापानावर एवढा खर्च होतो याची कल्पना नव्हती’
Just Now!
X