उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन होईल हे जाहीर केलंय.  आधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधीच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाउन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे.

लॉकडाउन वाढण्याची पाच कारणं काय?

१) पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक काही कारण नसताना घराबाहेर पडत आहेत

२) काही लोक मास्क न घालताना वावरत आहेत

३) करोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही

४) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्या वाढली आहे

५) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाउनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे

या पाच कारणांमुळेच लॉकडाउन वाढवण्याचा इशारा देण्यात आला होता. आता लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. एकीकडे देशात अनलॉक दोन सुरु झालंय. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाउन पुन्हा करावा लागतो अशी स्थिती आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. तर आत्तापर्यंत ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाउन आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.