हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव-दाभाडे येथे ही घटना घडली आहे. दामोदर तुकाराम फाळके असं मृत व्यक्तीचं नाव असून, पती दामिनी फाळके, प्रियकर राजेश कुरुप आणि मुलगा वेदांत फाळके यांनी दामोदर फाळके यांना मारहाण केल्याचं समोर आलं आहे. आणखी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबरला दामोदर फाळके यांचा अपघात झाल्याचा बनाव चारही आरोपींनी रचला होता. यानुसार तळेगाव-दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांना दामोदर फाळके यांचा अपघात नसून खून झाल्याचं समजलं. त्यातच दामोदर फाळके यांची पत्नी दामिनी फाळके व राजेश कुरुप यांच्यात गेल्या १२ वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचीही माहिती पोलिसांना समजली. यावरुन पोलिसांनी चारही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
यावेळी आपल्या पतीला असलेला कुष्ठरोग आपल्या दोन्ही मुलांनाही होईल अशी दामिनी फाळके यांना भीती होती. याचसोबत दामोदर यांच्या औषध-उपचारासाठी जमवत असलेला पैसाही अपुरा पडायला लागला होता. दामोदर यांच्या उपचारासाठी फाळके कुटुंबाने नातेवाईकांकडून १२ लाख रुपये उसने घेतले होते. अनेक उपचार करुनही दामोदर यांचा कुष्ठरोग बरा होत नव्हता, याचसोबत उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दामोदर कोणत्याही स्वरुपाची मदत करत नव्हते. यामुळेच त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली. शवविच्छेदन अहवालातही दामोदर यांना झालेल्या जखमा या अपघाताच्या नसून मारहाणीच्या असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2019 3:17 pm