News Flash

महिलांसाठीची फिरती स्वच्छतागृहे वापराविना

देखभाल दुरुस्तीअभावी महिलांसाठीच्या फिरत्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे.

महिलांसाठीची फिरती स्वच्छतागृहे वापराविना

दुरवस्था झाल्याने धूळखात पडून; भाडेकरारावर घेतलेल्या स्वच्छतागृहांचाही वापर नाही

पुणे : देखभाल दुरुस्तीअभावी महिलांसाठीच्या फिरत्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा महिलांना वापर करता येत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. शहराच्या अनेक भागात एकाच जागेवर स्वच्छतागृह असलेली वाहने गेल्या कित्येक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. दरम्यान, ही वस्तुस्थिती असताना करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने नव्याने काही स्वच्छतागृहे भाडेकराराने खरेदी केली आहेत. त्याचाही वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा असल्याचा अनुभव नागरिकांना शहरभर येत आहे. त्यातच महिला स्वच्छतागृहांचे प्रमाणही पुरुषांच्या स्वच्छतागृहांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी आहे. अस्तित्वातील महिला स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून सुरक्षिततेचा प्रश्नही येथे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिके ने महिलांसाठी खास फिरती स्वच्छतागृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला. शहराच्या विविध भागात ही सुविधा सुरू करण्यात आली. मात्र सुविधेनंतर फिरत्या स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती महापालिके कडून नियमित पद्धतीने करण्यास टाळाटाळ सुरू झाली. त्यामुळे फिरत्या स्वच्छतागृहांची दुरवस्था सुरू झाली आणि पर्यायाने या स्वच्छतागृहे वापराविना पडून राहिल्याचे चित्र पुढे आले आहे.

मुळातच महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचे शहरात अपुरे प्रमाण आहे. ज्या ठिकाणी महिलांसाठीची स्वच्छतागृहे आहेत, त्या ठिकाणी दुरवस्था झाल्याची वस्तुस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे महिला स्वच्छतागृहांचा वापरही तसा कमीच होत आहे.  देखभाल दुरुस्तीअभावी या गाडय़ा एका जागेवर उभ्या असल्याची कबुली महापालिके चे अधिकारीही देत आहेत. एका बाजूला महिलांच्या फिरत्या स्वच्छतागृहांची ही अवस्था असताना दुसऱ्या बाजूला करोना संसर्ग नियंत्रणासाठी फिरते स्वच्छतागृह भाडेकराराने घेण्याच्या नावाखाली उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून के ली जात असल्याचे चित्र पुढे आले आहे.

फिरत्या स्वच्छतागृहांवर उधळपट्टी

दाट लोकवस्तीच्या भागातील करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिके ने ही सुविधा दिली होती. दाट लोकवस्तीच्या भागात स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. त्यासाठी ३ हजार ४४७ रुपये मासिक दराने ५०० स्वच्छतागृहे भाडेकराराने घेण्यात आली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. चार कं पन्यांकडून भाडेकराराने स्वच्छतागृहे घेण्यात आली होती. त्यांना सध्या पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या या कं पन्यांना ४८ लाखांची रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र करोना काळात भाडेकराराने घेतलेली फिरती स्वच्छतागृहे कु ठे आहेत, असा प्रश्न नागरिकांकडून विचाला जात आहे.

महिलांसाठीचे बंद अवस्थेतील फिरते स्वच्छतागृह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 12:57 am

Web Title: without mobile toilets women ssh 93
Next Stories
1 फुकटचे बादशहा
2 गणेशोत्सवात रस्त्यावरील  वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाला घोर
3 फिरत्या विसर्जन हौदासांठी सव्वा कोटींचा खर्च
Just Now!
X