पाच रुपये शुल्कामुळे नागरिकांची पाठ

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिकेवर कडाडून टीका करणारे नागरिकही टापटीप, स्वच्छ आणि यांत्रिकी पद्धतीवर आधारित असलेल्या ई-टॉयलेट्सच्या वापराबाबत उदासीन असल्याचे चित्र पुढे आले आहे. शहरात तेरा ठिकाणी  उच्च दर्जाच्या सुविधा असलेली ई-टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत. त्यासाठी पाच रुपये शुल्क मोजावे लागत असल्यामुळे या स्वच्छतागृहांकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याचे निरीक्षण पुढे आले आहे. वापर होत नसला, तरी त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागत असल्यामुळे या योजनेत महापालिकेचेच आर्थिक नुकसान होत आहे.

शहरातील स्वच्छतागृहांची उभारणी महापालिकेकडून केली जाते. मात्र स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता, पायाभूत सुविधांचा अभाव, त्यांची देखभाल दुरुस्ती हे प्रश्न सातत्याने पुढे येतात. स्वच्छतागृहांवरून महापालिका आणि लोकप्रतिनिधींना सातत्याने टीकेचे धनी व्हावे लागत असल्यामुळे यांत्रिकी पद्धतीवर आधारित ई-टॉयलेट्स बसविण्यात आली. शहराचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार विकास निधीतून शहरात तेरा ठिकाणी अशा प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात आली. मात्र उच्च दर्जाची सुविधा असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र पुढे आले आहे.

मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही या स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. शहरातील महिला स्वच्छतागृहांची संख्या पुरुषांच्या स्वच्छतागृहांपेक्षा तुलनेने कमी असल्यामुळे महिलांसाठी ई-टॉयलेट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी नाणे (कॉईन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येतो. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होते. साफसफाई झाल्याशिवाय पुढे त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे स्वच्छता, टापटीप या गोष्टीतही ही स्वच्छतागृहं चांगली आहेत.

शहरात अशा प्रकारची स्वच्छतागृहे उभारण्यात आल्यानंतर प्रारंभी शुल्क  कमी होते. मात्र स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती आणि साफसफाईची कामे लक्षात घेता पाच रुपये शुल्क आकारण्याचे निश्चित करण्यात आले. पाच रुपये शुल्क देण्याची नागरिकांची इच्छा नसल्यामुळेच या स्वच्छतागृहांचा वापर घटला असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी तर त्यांचा अजिबात वापर होत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनीही त्याला दुजोरा दिला. ई-टॉयलेटच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. या स्वच्छतागृहांचा वापर व्हावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. यातील बहुतांश स्वच्छतागृहे महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे मोळक यांनी सांगितले.

पाच रुपये शुल्कामुळे ई-टॉयलेट्सचा वापरच नाही कमी होते. मात्र स्वच्छतागृहांची देखभाल दुरुस्ती आणि साफसफाईची कामे लक्षात घेता पाच रुपये शुल्क आकारण्याचे निश्चित करण्यात आले. पाच रुपये शुल्क देण्याची नागरिकांची इच्छा नसल्यामुळेच या स्वच्छतागृहांचा वापर घटला असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी तर त्यांचा अजिबात वापर होत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलताना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनीही त्याला दुजोरा दिला. ई-टॉयलेटच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याचे आढळून आले आहे. या स्वच्छतागृहांचा वापर व्हावा, यासाठी जनजागृती सुरू आहे. यातील बहुतांश स्वच्छतागृहे महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे मोळक यांनी सांगितले.

ई-टॉयलेटची वैशिष्टय़े

स्वयंचलित प्रणाली, अपंगांसाठी विशेष सुविधा, मानवविरहित यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता ही या स्वच्छतागृहांची वैशिष्टय़े आहेत. ई-टॉयलेटचा वापर देशातील अन्य प्रमुख शहरांमध्येही होत असून हे मॉडेल देशपातळीवरही नावाजले आहे. पुण्यात प्रथमच खासदार निधीतून मोठय़ा प्रमाणावर ई-टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत.

विविध भागांत ई-टॉयलेट

जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, सेनापती बापट रस्ता, नीलायम चित्रपटगृहाजवळ, वारजे उड्डाणपूल, विमाननगर, मॉडेल कॉलनी, गोखलेनगर, रामोशी वस्ती, शिवाजीनगर सत्र न्यायालय परिसर, केशवनगर, सिंहगड रस्ता- राजाराम पुलाजवळ, औंध या भागात ई-टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहे.