News Flash

पुणे : नव्या Lamborghini मधून फेरफटका मारण्यासाठी तळजाईच्या पायथ्याशी आला अन्….

पुण्यातल्या सहकारनगर भागातली घटना, महिला चालकासह इतर दोघांवर कारवाई

मास्क न घातल्यामुळे चालकासह दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र,सौजन्यः इंडियन एक्स्प्रेस)

विचार करा, तुम्ही नवी कोरी करकरीत गाडी घेतली आहे, तीही साधीसुधी नाही, तर चक्क Lamborghini…..तीन कोटीपेक्षाही अधिक किमतीची ही आलिशान गाडी हातात आल्यावर दिमाखात मिरवत गाडीतून एक फेरफटका मारायला निघालेला आहात. रस्त्यावरचा प्रत्येकजण तुमच्याकडे कुतुहलाने बघत आहे….

आणि अचानक…पोलिसमामा आडवे येतात, तुम्हाला थांबवून तुमच्या नावची पावती फाडली जाते आणि तेव्हा तुम्हाला कळतं की नव्या गाडीच्या उत्साहात तुम्ही मास्कच घालायला विसरला आहात आणि म्हणून तुमच्यावर पोलीस कारवाई झाली….कसं वाटेल तुम्हाला?

हेही वाचा- अरे पोलिसांची काम अशी करतोस; अजित पवारांनी ठेकेदाराची केली कानउघाडणी

अशीच एक घटना काल संध्याकाळी पुण्याच्या सहकारनगर भागात घडली. नवी कोरी Lamborghini घेऊन पहिलीच फेरी मारायला निघालेल्या एका परिवारावर मास्क न घातल्याने पोलिसांनी कारवाई केली. गाडीची महिला चालक आणि इतर दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. नव्या गाडीच्या उत्साहात हा परिवार मास्क घालायला विसरला होता. त्यामुळे पोलिसांनी आपल्या नियमानुसार ही कारवाई केली.

तळजाई टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या चौकात पोलिसांची तपासणी सुरु होती. त्यात त्यांना हा परिवार विनामास्क आढळून आला. कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तुम्ही कोणीही असा, कोणतीही गाडी घेऊन या, मात्र शासनाचे नियम पाळले नाहीत तर तुमच्यावर कारवाई नक्की!

तेव्हा तुम्हीही सावध राहा, शासनाच्या नियमांचं पालन करा, सुरक्षित राहा, मास्क वापरा… आणि लक्षात ठेवा, चुकीला माफी नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 9:42 am

Web Title: woman and two other found without mask roaming around in their new lamborghini car police took action vsk 98
Next Stories
1 अरे पोलिसांची कामं अशी करतोस; अजित पवारांनी ठेकेदाराची केली कानउघाडणी
2 पुण्यातील महात्मा फुले मंडईला आग
3 साथरोगांवर नियंत्रणासाठी सतर्कता नकाशा
Just Now!
X