11 August 2020

News Flash

हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

शुक्रवारी दुपारी आरोपी विशाल आणि महादेवी यांची मुलगी लक्ष्मी यांच्यात पुन्हा वाद झाला.

हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेच्या डोक्यात लोखंडी गज घालून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. वाकड परिसरात शुक्रवारी (३ जून) ही घटना घडली.
लक्ष्मी भंडारी (वय ३०, रा. म्हातोबानगर, वाकड) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विशाल राजाभाऊ विणकर (वय २०, रा. म्हातोबानगर, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. महादेवी भंडारी (वय ५०) यांनी या संदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विणकर आणि भंडारी हे शेजारी आहेत. महादेवी यांनी विणकर याच्या आईला हातउसने पैसे दिले होते. पैसे परत न के ल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.
शुक्रवारी दुपारी आरोपी विशाल आणि महादेवी यांची मुलगी लक्ष्मी यांच्यात पुन्हा वाद झाला. विशाल याने लक्ष्मी यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्यात लोखंडी गज घातला. यामध्ये लक्ष्मी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पसार झालेला आरोपी विशाल याला पोलिसांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक एम. के. आदलिंग तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 12:03 am

Web Title: woman attempt to murder over money dispute
Next Stories
1 पुणे स्टेशन परिसरात महिलेची पर्स हिसकाविली
2 पिंपरीत पर्यावरणाच्या नावाखाली ‘बाजार’
3 शनिवारची मुलाखत : स्वत:ची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा, ऐकीव माहितीवर विसंबून राहू नका!
Just Now!
X