News Flash

पुण्यात अंगातील भूत पळवण्यासाठी सुनेला मारहाण; गुंगीचे औषध देऊन काढला व्हिडिओ

३० वर्षीय पीडित महिला ही चिंचवडमधील गांधी पेठ येथे पतीसह राहण्यास होती.

संग्रहित छायाचित्र

अंगातील भूत पळवण्यासाठी सासरच्या व्यक्तींनी सुनेला मारहाण करत तिला गुंगीचे औषध दिल्याची घटना समोर आली आहे. गुंगीचे औषध देऊन त्यांनी सुनेचा व्हिडिओ काढल्याचा आरोप असून या प्रकरणी ३० वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.

३० वर्षीय पीडित महिला ही चिंचवडमधील गांधी पेठ येथे पतीसह राहण्यास होती. त्यांच्यासोबत सासू, सासरे, दिर, जाऊ हे देखील राहण्यास होते. तर नणंद मुंबईमधून चिंचवड येथे आली होती. या सर्वांनी मिळवून अंधश्रद्धेपोटी अंगातील भूत पळवून लावण्यासाठी ३० वर्षीय सुनेला मारहाण करत तिला गुंगीचे औषध पाजले. याचा त्यांनी व्हिडिओ देखील तयार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझी माहेरची स्थिती गरीब असून सासरच्यांनी माझ्या कुटुंबीयांकडून वारंवार पैसे घेतले. तसेच माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती परवेश शहा, सासरे बाबूमिया शहा, सासू, दिर शबाब बाबूमिया शहा, जाऊ सना शहा आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:18 pm

Web Title: woman beaten by in laws over superstitions in pimpri chinchwad
Next Stories
1 पाटील इस्टेट झोपडपट्टीत पुन्हा आग; सहा घरं खाक
2 मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण, राज्यात वादळी पावसाची शक्यता
3 कचराप्रश्नी निर्वाणीचा इशारा
Just Now!
X