20 October 2020

News Flash

केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

पुण्यात आत्महत्यचे सत्र सुरूच

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. आज केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  नैराश्यातून  या महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. यासना मुकेश बकसाना (वय 36) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मृत यासना मुकेश बकसाना यांच्या पतीचे तीन महिन्यांपुर्वी कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या 13 वर्षाच्या मुलगा देखील आजारी पडला. त्याला डायबेटिस आणि किडनीचा त्रास असल्याने अनेक दिवसांपासून केईएम रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे परिस्थितीसमोर हताश झालेल्या यासना यांनी पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास समर्थ पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी करत  आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 2:02 pm

Web Title: woman commits suicide by jumping from fifth floor of kem hospital msr 87 svk 88
Next Stories
1 पुणे : एमबीए झालेल्या तरुणीचं आदर्शवत पाऊल; लॉकडाउनमध्ये केक विक्रीतून सावरला कुटुंबाचा आर्थिक डोलारा
2 लघुउद्योजकाला ८० कोटींचे वीज देयक
3 धक्कादायक! पुण्यात दिवसभरात आढळले सर्वाधिक ६२० करोनाबाधित रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
Just Now!
X