06 December 2019

News Flash

पुणे- माणिकबाग येथे तरुणीचा खून, परिसरात खळबळ

गळा दाबून खून केल्याचे शवविच्छेदन अहवलात स्पष्ट

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग येथील सोसायटीत मंगळवारी एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तेजसा श्यामराव पायाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. २६ वर्षीय तेजसा माणिकबागमध्येच राहत होती.  या तरूणीचा गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा श्यामराव पायाळ ही माणिकबागेतील राधाकृष्ण सोसायटीमध्ये कुटुंबासोबत राहत होती. ती मूळची बीड येथील असून तिने एमबीएचे शिक्षण घेतले होते. हिंजवडी येथील एका कंपनीत ती कामाला होती. तिचे आई वडील गावी गेले होते. त्यांच्यासोबत तीदेखील गेली होती. मात्र चार पाच दिवसांपूर्वी पुण्यात घरी आली होती. मागील दोन तीन दिवसांपासून तिचा फोन लागत नव्हता. तिच्या आईने घरी आल्यावर पाहिले असता. घरात तिचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला होता. या तरूणीचा गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवलात समोर आले आहे.  याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तरूणीच्या अंगावर अनेक जखमा देखील आढळल्याची माहिती मिळाली आहे. सिंहगड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First Published on December 3, 2019 10:29 am

Web Title: woman dead body found in pune sgy 87
Just Now!
X