पिंपरी-चिंचवडच्या विविध भागात शुक्रवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार गारांचा पाऊस पडला.यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.वादळी वाऱ्यामुळे हवेत प्लाष्टीक च्या पिशव्या,फलक उडताना दिसत होते.अश्याच एका होर्डिंग खाली थांबलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.ही घटना शुक्रवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड च्या पुनावळ्यात घडली आहे.

कांताबाई विश्वनाथ भारती वय-५५ रा.चिखली अस अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून हलक्या स्वरूपाच्या सऱ्याने पाऊसाला सुरुवात झाली.परंतु चारच्या सुमारास अचानक अंधारून आले आणि वादळी वाऱ्यासह गारांचा दमदार पाऊस शहरात बरसला,यामुळे शहरातील बहुतांश भागातील झाड कोलमडून पडली होती.तर याचा फटका नोकरदार वर्गाला बसला.येन नोकरीदार वर्ग घरी जाण्याचे वेळीच पाऊसाने हजेरी लावली होती.यामुळे त्यांची तारांबळ उडाली.शहरात कोणतीही जीवितहानी नसता मात्र सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.पाऊस आल्याने कांताबाई या होर्डिंग खाली थांबल्या होत्या,वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने होर्डिंग खाली कोसळले आणि यातच कांताबाई गंभीर जखमी झाल्या.त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.याप्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.