News Flash

पुण्यात महिला डॉक्टरची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या

आजारपणाला कंटाळूनआयुष्य संपवले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुण्यातील सुख सागरनगर येथील गजानन क्लिनिकच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. इंदू डोंगरे असे मृत महिलेचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली असावी, असा प्राथिमिक अंदाज कोंढवा पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन क्लिनिक आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ञाकडे उपचार घेत होत्या. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्मत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

चौथ्या मजल्यावरुन पडल्यानंतर इंदू गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डॉ. पतीने स्वत:च्या क्लिनिकमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला. त्यानंतर उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेताना इंदू यांनी प्राण सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2017 10:57 am

Web Title: woman doctor jumped from the fourth floor and committed suicide in pune
Next Stories
1 कॅबमध्येही परतीची लूट
2 पुण्यात ई-रिक्षांचा मार्ग अखेर मोकळा!
3 मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी दौऱ्यात ‘ऑनलाइन’चा पर्याय
Just Now!
X