24 November 2020

News Flash

कोंबडा आरवल्याने झोपमोड, पुण्यातील महिलेची पोलिसांकडे तक्रार

समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका महिलेकडून अशा स्वरूपाची तक्रार दोन दिवसापूर्वी करण्यात आली

प्रतिकात्मक छायाचित्र

पहाटे कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोपमोड होते, अशी तक्रार पुण्यातील महिलेने समर्थनगर पोलीस ठाण्यात केली आहे.  एका महिलेने पोलीस ठाण्यात निनावी अर्ज दिला असून हा अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेले. अखेर पोलिसांनी या अर्जाच्या आधारे प्राथमिक चौकशीला सुरुवात केली खरी पण हा प्रकार महापालिकेशी संबंधित असल्याने तक्रारदाराने महापालिकेकडे तक्रार केली पाहिजे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे. या तक्रार अर्जात महिलेने म्हटले आहे की, घराजवळ पहाटे साडे चार वाजता कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, असे महिलेने म्हटले आहे. महिलेचा हा तक्रार अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेले होते.

या तक्रार अर्जाबाबत समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले की, समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका महिलेकडून अशा स्वरूपाची तक्रार दोन दिवसापूर्वी करण्यात आली होती. त्यातक्रारीनुसार तपास सुरु आहे.

पुणे तिथे काय उणे, असे आपण नेहमीच ऐकतो. काही दिवसांपूर्वी पाळीव श्वानाचा आजार बरा व्हावा, श्वानाच्या मालकाने जागरण गोंधळ घातले होते. आता तर एका महिलेने पहाटे कोंबडा आरवतो म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आहे. या अनोख्या तक्रारीची सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 2:30 pm

Web Title: woman files police complaint because of roosters noise at samarth nagar police
Next Stories
1 अकरावी प्रवेशांसाठी जागा आणि ‘कट ऑफ’ही वाढणार
2 कोथरूडमध्ये सर्वाधिक मताधिक्य
3 श्रीरंग बारणे यांना पाच विधानसभा मतदार संघांत मताधिक्य
Just Now!
X