04 August 2020

News Flash

पुणे स्टेशन परिसरात महिलेची पर्स हिसकाविली

पर्समध्ये रोकड, मोबाईल आणि एटीएम कार्ड असा सात हजार ८५० रुपयांचा ऐवज होता.

मध्य प्रदेशातून पुण्यात कामानिमित्त आलेल्या महिलेची पर्स चोरटय़ांनी हिसकावून नेल्याची घटना शनिवारी पहाटे पुणे स्टेशन परिसरात घडली.पूजा कुणाल अष्टेकर (वय २७) यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अष्टेकर कामानिमित्त पुण्यात आल्या. शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्या जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या बोल्हाई चौकाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरटय़ाने अष्टेकर यांची पर्स हिसकाविली.
पर्समध्ये रोकड, मोबाईल आणि एटीएम कार्ड असा सात हजार ८५० रुपयांचा ऐवज होता. अष्टेकर यांनी तेथून काही अंतरावर असलेल्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक आर. डी. गायकवाड तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 12:01 am

Web Title: woman handbag stolen in pune station area
Next Stories
1 पिंपरीत पर्यावरणाच्या नावाखाली ‘बाजार’
2 शनिवारची मुलाखत : स्वत:ची क्षमता ओळखून क्षेत्र निवडा, ऐकीव माहितीवर विसंबून राहू नका!
3 बाळासाहेब लांडगे यांना  पिपरी-चिंचवड भूषण पुरस्कार
Just Now!
X