News Flash

कोयत्याचा धाक दाखवून पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गालगत महिलेवर बलात्कार

अज्ञात आरोपीनं बेदम मारहाण करीत केली शिवीगाळ

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गालगत भर दिवसा एका महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अत्याचार झालेली २६ वर्षीय पीडित महिला एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये कामाला असून आपलं काम आटोपून ती दुपारच्या सुमारास आपल्या घरी जाण्यास निघाली होती. तेव्हा, अचानक एका ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीने या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने द्रुतगतीमार्गालगत असलेल्या झाडीत नेले आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, आरोपी व्यक्तीने महिलेच्या अंगावरील कपडे कोयत्याने फाडत तिला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केल्यांचंही फिर्यादीत म्हटलं आहे. पीडित महिलेने स्वतःचं पोलीस नियंत्रण कशाला फोन करून संबंधित घटनेविषयी माहिती दिली. त्यानंतर तात्काळ महिला पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:20 pm

Web Title: woman raped on pune mumbai expressway for fear of being stabbed aau 85 kjp 91
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा वाटणार १० लाख लाडू; आमदारांना पोलिसांची नोटीस
2 पुणे : धरण क्षेत्रांत जोरदार पाऊस; २४ तासांत पाणीसाठ्यात ३ टीएमसीने वाढ
3 २४ तासांत शहराला २५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा
Just Now!
X