News Flash

पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेचा स्वतःची वेणी कापल्याचा दावा

घाबरलेली महिला सध्या नातेवाईकांकडे

या प्रकारामुळे आबिदा सध्या घाबरलेल्या आहेत.

उत्तर भारतात महिलांची वेणी कापण्याच्या काही घटना घडल्याच्या चर्चेनंतर त्यासारखाच एक प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. मुलीला शाळेत सोडायला गेलेल्या एका महिलेने तिची वेणी कापल्याचे म्हटले आहे. आबिदा अन्सारी असे वेणी कापल्याचा दावा करणाऱ्या महिलेचं नाव आहे. हा संपूर्ण काय प्रकार आहे, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

बिहार, दिल्ली, राज्यस्थान, उत्तर प्रदेश, मुंबईनंतर या विचित्र प्रकाराचे लोण थेट पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहे. आबिदा अन्सारी (वय ४२, रा. साईबाबा नगर, चिंचवड) या बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास मुलगी मुस्कान आणि आलिया यांना महानगरपालिकेच्या शाळेतून घेण्यासाठी गेल्या होत्या. आबिदा यांच्यासोबत त्यांच्या शेजारी राहणारी महिला देखील होती. मुलींना शाळेतून घेऊन आल्यानंतर आबिदा यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी मुलीला डोकं दाबण्यास सांगितलं. त्यावेळी मुलीच्या हातात कापलेली वेणीच आली, असे त्यांनी म्हटले आहे. घरापासून केवळ २०० मीटर अंतरावर त्यांच्या मुलीची शाळा आहे. या प्रकारामुळे आबिदा सध्या घाबरलेल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात नक्की काय घडले हे नेमकेपणाने समजलेले नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर आबिदा घाबरल्या असल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:38 pm

Web Title: women braid cutting incidence in pimpari chinchwad
Next Stories
1 बहुमजली मांडवांमुळे कोंडी
2 दोन नव्या ‘डेमू’ आल्या, पण यार्डातच!
3 पीएमपी मासिक पासची किंमत सरसकट चौदाशे रुपये
Just Now!
X