पुण्यात इमारतीमधील नवा फ्लॅट पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा ९ व्या मजल्यावरून खाली पडून दुर्देवी अंत झाला. या महिलेचे नाव अनुश्री पांडे (३५) असे आहे. येथील पौड फाटा परिसरात अनुश्री पांडे मंगळवारी कुमार बिल्डरच्या इमारतीमध्ये सदनिका पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी १७ व्या मजल्यावरील सॅम्पल फ्लॅट पाहत असताना अनुश्री यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. ही इमारत ४२ मजल्यांची असून पुण्यातील आतापर्यंतची सर्वात उंच ही इमारत असल्याचा दावा करण्यात येतो आहे. या इमारतीचे बांधकाम अजूनही सुरू आहे. अनुश्री पांडे ज्याठिकाणी पडल्या तेथे बांधकामाचे साहित्य आणि पत्रे होते. दरम्यान, या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह ससून रूग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुश्री पांडे या गृहीणी आहेत. त्यांना नवीन फ्लॅट घ्यायचा होता.अनुश्री यानी कुमार प्रकल्पाच्या जागी जाण्यापूर्वी त्या विषयी चौकशी केली होती. त्यासाठी त्यांना सॅपल फ्लॅट पहाण्यासाठी सायंकाळी पाचला बोलविण्यात आले होते. त्यामुळे त्या एकट्याच त्या ठिकाणी गेल्या होत्या. या इमारतीच्या ९ व्या मजल्यावर सॅपल फ्लॅट असल्याने कुमार पॉपर्टीजच्या कर्मचारी ९ व्या मजल्यावर घेऊन गेले. फ्लॅट पाहिल्यानंतर इतर बांधकाम पाहात असताना त्यांचा आचानक तोल जाऊन त्या खाली पडल्या.त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती कोथरुड पोलिसांना माहिती मिळताच त्यानी घटना स्थळी धाव घेऊन त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून बिल्डर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.