02 March 2021

News Flash

पिंपरीत वाहतूक विभागातील महिला पोलिसानं घेतली लाच; घटना कॅमेऱ्यात कैद

संबंधित कर्मचाऱ्याला लेखी खुलासा करण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अवैध धंदे हद्दपार झाल्याचं दिसत आहे. यासाठी सामाजिक सुरक्षा पथक ही तयार करण्यात आलं. असं असताना वाहतूक विभागातील एक महिला पोलीस कर्मचारी लाच घेत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पिंपरीतील वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी या वाहतूक पोलीस अधिकारी जवळ असताना त्यांची नजर चुकवून लाच घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे, बेकायदा दारू विक्री, गुटखा विक्री, अशा प्रकरणावर पायबंद घालण्यात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना यश आले आहे. परंतु अशातच वाहतूक विभागातील एक महिला पोलीस कर्मचारी लाच स्वीकारत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पिंपरीला पाहिलं जातं. याच ठिकाणी बाजारपेठ असल्याने मोठी वाहतुककोंडी होत असते. दररोज सायंकाळच्या सुमारास वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असतात. मात्र, एका वाहतूक महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिला चालकांकडून दुचाकीवरील कारवाई टाळण्यासाठी लाच घेतल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. इतरांची नजर चुकवून पाठीमागच्या खिशात पैसे टाकल्याचंही व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांना संबंधित प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यात सत्यता आढळल्यास महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली. तर, यासंबंधी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचारी यांना लेखी खुलासा द्यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 9:39 pm

Web Title: women from pimpri traffic police department took bribe incident captured on camera kjp 91 jud 87
Next Stories
1 “…तर हे सरकाराच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही”; बाबा आढाव यांचा केंद्र सरकारला इशारा
2 “आपले जे काही वैचारिक मतभेद असतील ते नंतर पाहू…,” राजू शेट्टींचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन
3 “बाबा तुझी नेमकी भूक तरी किती?,” राजू शेट्टी मुकेश अंबानींना विचारणार प्रश्न
Just Now!
X