News Flash

शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

खेड पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपी फरार

शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल
संग्रहित छायाचित्र

खेडमधील चासकमान येथे २२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने शरीरसंबंधास नकार दिल्याने आरोपीने तिचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे व्हायरल केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून खेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ कैलास नाईकरे असे बलात्कार केलेल्या आरोपीचे नाव असून तो अद्याप फरार आहे. खेड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सिद्धार्थ पीडित महिलेवर गेल्या पाच महिन्यांपासून वेळोवेळी बलात्कार केला आहे. त्याचबरोबर या महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार या महिलेवर अत्याचार केला आहे. मात्र, दुसऱ्या वेळेस या महिलेने शारिरीक संबंधास नकार दिल्याने आरोपीन सिद्धार्थने व्हॉट्सअॅपवर पीडित महिलेचे अश्लील फोटो वायरल केले.

ही बाब लक्षात येतात पीडित महिलेने रात्री उशिरा खेड पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी सिद्धार्थ फरार झाला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 8:36 am

Web Title: women refuses to sex photos got viral on the whatsapp group by accused offence register by khed police
Next Stories
1 पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; १८ मजुरांचा मृत्यू, १३ जखमी
2 आघारकर संस्थेने साकारले ‘हिमोग्लोबिन कॅलक्युलेटर किट’
3 सरकारच्या नावीन्यपूर्ण धोरणांमुळे झालेल्या प्रगतीचा अभ्यास आणि विश्लेषण व्हावे
Just Now!
X