28 February 2020

News Flash

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची पुण्यात नैराश्यातून आत्महत्या

राहत्या घरी विषप्राशन करून केली आत्महत्या

हिंजवडीतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत असलेल्या ३१ वर्षीय तरुणीने रविवारी रात्री विषप्राशन करून आत्महत्या केली. तपस्या भास्कर असे या तरुणीचे नाव आहे. नैराश्यातून तिने ही आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपस्या भास्कर ही मूळची जयपूरमधील आहे. गेल्या काही वर्षांपासून ती पुण्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम करते. ती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. रविवारी रात्री तिने जगताप डेअरीजवळील बोरा हॅप्पी सोसायटीतील राहत्या घरातच विषप्राशन करून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपस्या भास्कर हिचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. वाकड पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

First Published on December 14, 2015 11:00 am

Web Title: women software engineer commits suicide in pune
Next Stories
1 शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार
2 सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीदान समांरभ संपन्न
3 एकडॉक्टरी दवाखाने वैद्यकीय आस्थापना कायद्यातून वगळणार?
Just Now!
X