महिला नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील महिला मेळाव्यात बोलत असताना, महिला आरक्षण या शब्दाचाच मला तिटकारा निर्माण होतो. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
महिला आरक्षणाची गरजच का पडावी? असा सवाल उपस्थित करत आपण सक्षमच आहोत या विचाराने महिलांनी वागले पाहिजे असेही राज ठाकरे म्हणाले.
सभेला उपस्थित असणाऱया पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, “समाज आणि राजकारणात काम करत असताना येणाऱया पिढीचा विचार करून काम करा, त्यांचे म्हणणे समजून घ्या.” असे राज ठाकरे म्हणाले.
त्यांनी यावेळी समाजातील यशस्वी आणि धाडसी महिलांची उदाहरणेही दिली. महिला शिक्षणासाठी तालिबान्यांच्या विरोधात पाकिस्तानच्या मलालाने दिलेल्या लढ्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच उद्धस्त पुण्याच्या विकासाची मुहूर्तमेढ जिजाऊंनी रोवली असल्याचेही त्यांनी म्हटले.