पश्चिम घाट (सह्याद्री) व कोकण परिसरातील विविध पर्यावरण कार्यकर्ते, संस्था व निसर्गप्रेमींसाठी ४ एप्रिल रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गोखलेनगर येथील नालंदा बुद्ध विहारात (ओम मार्केटच्या मागे) होणार आहे.
या कार्यशाळेत पश्चिम घाटाचे संरक्षण-संवर्धन, या परिसरातील बेकायदेशीर विकास प्रकल्प, डॉ. गाडगीळ व डॉ. कस्तुरीरंगन अहवालांची सद्य:स्थिती, डॉ. गाडगीळ अहवालाबाबतची वस्तुस्थिती, जैवविविधता मंडळ, वृक्षप्राधिकरण समिती बाबतची उदासीनता, अयोग्य अंमलबजावणी, पर्यावरण व वन्यजीव कायद्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप व अयोग्य बदल, भूसंपादन कायदा, स्थानिक पर्यावरणविषयक प्रश्न व उपाय यांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी विनोद जैन, पुणे (९४२२३०५७३५, ७५८८८६७२६३) आणि डॉ. मधुकर बाचुळकर, कोल्हापूर (९७३०३९९६६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Barty, Sarathi
बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार