कुटुंबीयांसाठी करोना काळ कसोटीचा

जागतिक अल्झायमर्स दिवस..

पुणे : स्मृतिभ्रंशांशी संबंधित अल्झायमर, डिमेन्शिया सारखे विकार असलेल्या रुग्णांचा सांभाळ हे त्यांच्या कुटुंबियांसाठी करोना काळातील एक आव्हान आहे. अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, सतत हात धुणे आणि मुख्य म्हणजे घरातच बंदिस्त राहणे या बाबींची स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना सवय लावणे अवघड जाते. त्यामुळे असे रुग्ण आणि त्यांच्या कु टुंबीयांसाठी सध्याची करोना परिस्थिती अधिक त्रासदायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आजच्या (२१ सप्टेंबर) ‘जागतिक अल्झायमर जागृती दिवसा’च्या निमित्ताने करोना संकट काळातील स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता’ने के ला. अल्झायमर किं वा डिमेन्शिया असलेल्या रुग्णांना नेहमीच्या गोष्टी वारंवार सांगाव्या लागतात. त्यांच्यात संभ्रम निर्माण होण्याचे प्रमाण खूप असते. विरोध सहन करण्याची प्रवृत्ती नसते. त्यामुळे बाहेर जायचे नाही, मुखपट्टी वापरायची, सतत हात धुवायचे हे त्यांना वारंवार सांगितले तर त्यांची चिडचिड होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मानसोपचारतज्ज्ञ आणि जागृती पुनर्वसन संस्थेचे संस्थापक डॉ. अमर शिंदे म्हणाले, ‘‘स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या कु टुंबीयांनी करोना काळात अनेक आव्हानांचा सामना के ला आहे. घरात डिमेन्शियाचे रुग्ण असतील तर त्यांची सेवा-सुश्रुषा करणे, त्यांना घरातच राहण्याचा आग्रह करणे, मुखपट्टीचा वापर करण्याची सवय लावणे या गोष्टी अवघड जात आहेत.’’

बाहेरून मदतनीस बोलवता येत नाही. अनेक पुनर्वसन के ंद्रांनी या काळात नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद के ले आहे. सकाळी किं वा संध्याकाळी बाहेर फे रफटका मारणेही बंद झाल्यामुळे सतत घरात राहून अशा रुग्णांची चिडचिड वाढली आहे. मुखपट्टीचे महत्त्व, स्वच्छतेची गरज, गर्दीत का जायचे नाही हे प्रभावीपणे रुग्णांना सांगावे, असेही डॉ. शिंदे म्हणाले.

काय काळजी घ्यावी?

* कुटुंबीयांनी रुग्णाशी सतत संवाद सुरू ठेवावा. रुग्णाच्या डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घ्यावा.

* आजाराची साथ, तिचे गांभीर्य याबाबत सतत माहिती देत राहावी.

* चित्रे, सूचना सतत रुग्णांना दिसतील अशा ठिकाणी लावल्यास उपयोग होऊ शकतो.

एकच गोष्ट वारंवार सांगितल्याने स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची चिडचिड होते. कु टुंबीय बाहेर जात असतात, म्हणून ते मुखपट्टी लावून रुग्णांजवळ गेल्यास गैरसमजातून त्यांना दूर लोटणे, प्रसंगी हल्ला करणे असे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे हा काळ कुटुंबियांसाठी कसोटीचा आहे.

–  डॉ. अमर शिंदे, मानसोपचारतज्ज्ञ