भारताला पहिल्यांदाच मान

पुणे : अंधश्रद्धा, धार्मिक समजुती आदी कारणांमुळे कमी होत असलेल्या घुबडांविषयी जनजागृती करण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी सहावी जागतिक घुबड परिषद शुक्रवार (२९ नोव्हेंबर) आणि शनिवारी (३० नोव्हेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. या परिषदेत १६ देशांतील अभ्यासकांचा सहभाग असून, चर्चा, व्याख्याने, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत.

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
victory of the United Alliance of Leftist Student Unions in the JNU Student Union Elections
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष
mumbai university budget marathi news, mumbai university budget 857 crores marathi news
मुंबई विद्यापीठाचा ८५७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवशास्त्र विभाग आणि पर्यावरणशास्त्र विभागाने या परिषदेच्या आयोजनासाठी सहकार्य केले आहे. घुबडांविषयी शास्त्रीय माहितीचे आदानप्रदान, अधिवास, विविध देशांतील संस्कृतीतील घुबडांचे स्थान अशा विषयांवर परिषदेत चर्चा केली जाईल. ‘आऊल्स ऑफ द वर्ल्ड’सारखे ग्रंथ लिहिलेले जेम्स डंकन यांच्यासारखे नामवंत संशोधक परिषदेत सहभागी होणार आहेत. अभ्यासकांच्या चर्चासह विद्यार्थ्यांसाठीची परिषद होणार आहे. त्यात विद्यार्थ्यांशी अभ्यासक संवाद साधणार आहेत.

‘परिषदेच्या आयोजनाचा मान पहिल्यांदाच भारताला मिळाला आहे. या पूर्वीची परिषद पोर्तुगालमध्ये झाली होती. संवर्धनासाठी संशोधन आणि जनजागृती होणे आवश्यक असते. या दोन्हीला चालना देण्याचा परिषदेचा प्रयत्न आहे. या परिषदेनंतर मंगळवार (३ डिसेंबर) आणि बुधवारी (४ डिसेंबर) पिंगोरी येथे उलुक महोत्सव होणार आहे,’ असेही पांडे यांनी सांगितले.

घुबडांविषयी माहितीपूर्ण प्रदर्शन

परिषदेत घुबडांविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचाही समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारची घुबडे, त्यांचे अधिवास, प्रजनन, त्यांना असलेले धोके छायाचित्रांच्या माध्यमांतून मांडले जातील. हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.