19 September 2020

News Flash

चिंताजनक! पुण्यात दिवसभरात आढळले ४६० रुग्ण; १२ रुग्णांचा मृत्यू

आज अखेर ६ हजार ७१३ रुग्ण झाले करोनामुक्त

प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यात आज दिवसभरात नव्याने ४६० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या १०,६४३ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करोनावर उपचार घेणार्‍या ११७ रुग्णांची आज पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६ हजार ७१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, राज्यात आज ३,३०७ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ लाख १६ हजार ७५२ वर पोहोचली. त्याचबरोबर दिवसभरात ११४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, १,३१५ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ हजार १६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घऱी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ५१ हजार ९२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी एकट्या मुंबईत २६ हजार ९९७ रुग्ण आहेत.

तर देशात गेल्या २४ तासात करोनाचे १० हजार ९७४ रुग्ण आढळले असून २००३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या तीन लाख ५४ हजार ६५ वर पोहोचली आहे. तर मृत रुग्णांची संख्या ११ हजार ९०३ झाली आहे. यामध्ये १ लाख ५५ हजार २२७ अॅक्टिव्ह तसेच १ लाख ८६ हजार ९३५ बरे होऊन घऱी गेलेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 9:42 pm

Web Title: worrying 460 patients found in pune during the day 12 patients died aau 85 svk 88
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्राला आणि पर्यावरणाला वाचवायला माळकरी, वारकरीच पुरेसे – सयाजी शिंदे
2 पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी
3 पुणे : सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पार पडली मनपाची सर्वसाधारण सभा
Just Now!
X