News Flash

मंदीच्या समस्येवर चुकीचे उपचार!

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत आर्थिक मंदीसंदर्भातील व्याख्यानात सिन्हा बोलत होते.

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपन्यांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याबाबत जाहीर केलेल्या निर्णयावर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सोमवारी कडक टीका केली.

‘कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यानंतर देशभरातील चारशे कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या केवळ ०.७ टक्के कंपन्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे कंपन्यांचा केवळ ताळेबंद सुधारेल, पण या निर्णयाने शेतकऱ्यांच्या किंवा सर्वसामान्यांच्या खिशात पैसा येणार आहे का,’ असे प्रश्न विचारत मंदीच्या समस्येवर चुकीचे उपचार केले जात असल्याची टीकाही सिन्हा यांनी केली.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत आर्थिक मंदीसंदर्भातील व्याख्यानात सिन्हा बोलत होते. संस्थेच्या प्रा. संगीता श्रॉफ या वेळी उपस्थित होत्या. सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या अर्थविषयक धोरणांवर टीका केली.

‘नोटाबंदी आणि जीएसटीमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेसह कृषी, बांधकामासह सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्र संकटात असल्याने ग्रामीण भागातील उत्पन्नवाढ घटली आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्र, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होऊन नोकऱ्यांची संख्या कमी झाली. असंघटित क्षेत्राची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. कारखाने बंद पडल्याने कामगारांच्या क्रयशक्तीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘मनरेगा’ योजनेत काम करण्याची वेळ अनेकांवर आली आहे. या सगळ्याचा परिणाम कॉर्पोरेट क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढत नसून, आर्थिक मंदीच्या विषचक्रात आपण अडकलो आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:29 am

Web Title: yashwant sinha slam central government over economy slowdown zws 70
Next Stories
1 ‘प्लास्टिक प्रचार साहित्यासंदर्भात कार्यकर्त्यांचेही प्रबोधन’
2 मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान राजकीय भीतीपोटी! प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
3 इतरांशी तुलना करून यशापयशाचे मोजमाप करणे अयोग्य
Just Now!
X