News Flash

आर्थिक मदत आली, पण माळीण पुनर्वसन रखडलेलेच!

माळीणचे पुनर्वसन एक वर्षांच्या आत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वानी दिले होते. ते मात्र जागा लवकर निश्चित न झाल्यामुळे अद्याप रखडलेलेच आहे.

| July 30, 2015 03:30 am

डोंगरउतारावरील दगड कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्देवी माळीणच्या घटनेला 29Malin2गुरुवारी (३० जुलै) एक वर्ष पूर्ण होत असताना शासनाकडून आíथक स्वरूपातील मदत मिळाल्याचे चित्र आहे. मात्र, पुनर्वसन अद्याप मार्गी लागलेले नाही. त्याप्रमाणे या दुर्घटनेत अंशत: बाधित झालेल्या कुटुंबांची परवड झाली आहे. या कुटुंबांना गुरांचे गोठे बांधून देण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे, तात्पुरत्या म्हणून उभारण्यात आलेल्या निवारा शेडमध्येही अनेक गरसोई आहेत.माळीण येथे वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेमध्ये ४४ कुटुंबातील १५१ लोक दरडीखाली अडकून मरण पावले. त्यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येक मृत व्यक्तीमागे साडेआठ लाख रुपये देण्यात आले. तसेच, विविध योजनांमधूनही आíथक व वस्तू स्वरूपातील मदत देण्यात आली आहे. माळीणचे पुनर्वसन एक वर्षांच्या आत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांसह सर्वानी दिले होते. ते मात्र जागा लवकर निश्चित न झाल्यामुळे अद्याप रखडलेलेच आहे.माळीणचे पुनर्वसन एक वर्षांत करण्याचे नियोजन असल्यामुळे तात्पुरती निवारा शेड अतिशय छोटय़ा आकाराची व साध्या पत्र्याची बांधण्यात आली. त्यामुळे माळीण ग्रामस्थांना या अपुऱ्या जागेतच राहावे लागत आहे. या घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरायला लागल्यामुळे ग्रामस्थांनी स्वत: घरांच्या पुढे लाकूड व प्लास्टिक कागदांचे शेड ओढले आहे.शासनाने मोठी मदत केली, मात्र अंशत: बाधित झालेल्या कुटुंबांचे यामध्ये हाल झाले. त्यांना लवकर तात्पुरती निवारा शेड मिळाली नाही. घरांमधील कपडे-सामान चोरीस गेले. वाचलेली जनावरे बांधण्यास जागा राहिली नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या घरांमध्ये राहून त्यांना दिवस काढावे लागले.तसेच माळीण दुर्घटनेतील नातेवाईकांची रजा मंजूर करण्यात यईल, असे माळीण दुर्घटनेला भेट देणाऱ्या प्रत्येक नेत्याने आश्वासन दिले होते. मात्र येथील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर झाल्या नाहीत. त्यांना रजा मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागले.माळीण दुर्घटनेत बाधित झालेल्या युवक व युवतींसाठी अनेक वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात येणाऱ्या खासगी कंपन्या सहा ते आठ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्या देत होते. या पगारावर मंचर, चाकण, भोसरी सारख्या ठिकाणी राहून काम करणे परवडत नसल्याने अनेकांनी नोकऱ्या सोडून दिल्या आहेत.

अशी असतील पुनर्वसित घरे

माळीणची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने अडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहिल्या. परंतु, यातील एकही जागा निश्चित होऊ शकली नाही. त्यानंतर कशाळवाडीची जागा पाहिली. परंतु येथे ८ एकर जागा मिळू शकली नाही म्हणून चिंचेचीवाडी व आमडे येथील दोन जागा पाहण्यात आल्या. यातील आमडे जागेला ग्रामस्थ व भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण विभाग (जीएसआय) अशी सर्वानी सहमती दिली. परंतु, आता ग्रामस्थांमध्ये या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिकांना दीड गुंठय़ाच्या प्लॉटमध्ये घरे वेगवेगळी बांधून हवी आहेत. कारण त्यांना कोंबडय़ा, शेळ्या पाळाव्या लागतात, बल सांभाळावे लागतात, शेण टाकायला उकीरडा लागतो, सरपण भरावे लागते.या मुद्दय़ांबाबत माळीण पुनर्वसनाचा आराखडा तयार केलेले वास्तुविशारद योगेश राठी यांनी सांगितले की, माळीणचा परिसर डोंगराळ आहे. येथे पुन्हा अशी घटना घडू नये अशी जागा निश्चित करणे अतिशय अवघड होते. आमडेची जागा योग्य वाटली म्हणून ही जागा निश्चीत करण्यात आली. माळीणची घरे भूकंपरोधक बनविण्यात येणार आहेत. लोकांनी याबाबत काही चिंता करू नये. येथील एका घराला ६ ते ८ लाख रूपये खर्च येणार आहे. चुकून डोंगरावरून एखादा दगड गडगडत खाली आला तर तो थांबावा यासाठी गावाच्या मागे डोंगरपायथ्याशी मोठी संरक्षक िभत बांधली जाणार आहे. तसेच डोंगरावरील जमीन पक्की राहावी यासाठी झाडे लावली जाणार आहेत.

 माळीण दुर्घटनेवर ‘पाठय़पुस्तकात धडा

माळीण येथे घडलेल्या नसíगक आपत्तीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात ‘माळीण गाव : एक घटना’ हा पाठ समाविष्ठ करण्यात आला आहे. पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने आपत्ती, दुर्घटना व व्यवस्थापनाची विद्यार्थी दशेतच माहिती व्हावी म्हणून या पाठाचा पाठय़पुस्तकात समावेश झाला आहे. या पाठात घटनेसंदर्भात वर्तमान पत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे देण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 3:30 am

Web Title: yet to complete rehabilitation
Next Stories
1 खंडणीसाठी शिक्षकानेच केले पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अपहरण
2 आज रंगणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची ‘रॉक कॉन्सर्ट’
3 चार महिने रखडलेल्या रस्त्याचे काम चार तासांत
Just Now!
X