28 September 2020

News Flash

पालिकेकडून आता विद्यार्थ्यांना योगाचे धडे!

शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यानंतर विद्यार्थ्यांनाही योगाचे धडे दिले जाणार आहेत.

शारीरिक, मानसिक संतुलन वाढावे, अभ्यासात लक्ष लागावे या दृष्टीने महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले जाणार आहेत. महिला बाल कल्याण समितीने ठराव करून या बाबतचा प्रस्ताव पालिकेच्या शिक्षण विभागाला दिला असून, दिवाळीच्या सुटीनंतर आधी शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यानंतर विद्यार्थ्यांनाही योगाचे धडे दिले जाणार आहेत.

आताच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटचे व्यसन वाढत असल्याचे, त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थ्यांना स्मार्टफोनपासून दूर करून आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्यासाठी, त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी शाळेच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्याचा ठराव करून त्या बाबतचा प्रस्ताव सादर केला. विद्यार्थ्यांसाठी योगाचे विविध उपक्रम घेण्यात यावेत, दिवसाची सुरुवातच अशा उपक्रमांनी व्हावी, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

पुणे महापालिकेच्या शहरातील विविध भागांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा विविध माध्यमांच्या जवळपास २८७ शाळा आहेत. या शाळांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. तर शिक्षकांची संख्या सुमारे अडीच हजार आहे. ‘महिला आणि बालकल्याण समिती’कडून विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देण्यासाठी आधी शिक्षकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटीनंतर लगेचच शिक्षकांसाठी योग प्रशिक्षण घेण्यात येईल. त्यानंतर प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना योगाचे धडे देतील.     – शिवाजी दौंडकर, महापालिका शिक्षण विभाग प्रमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 4:49 am

Web Title: yoga in pune
Next Stories
1 स्वच्छ सर्वेक्षणाची गडबड, धोरणांची ऐशीतैशी!
2 दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर ‘यूएपीए’अंतर्गत होणार कारवाई?
3 पुणे महापालिकेने २४ थुंकी सम्राटांकडून रस्ता करुन घेतला साफ
Just Now!
X