किडनी विकारावर योगसाधना प्रभावी ठरत असल्याचे सिध्द झाले आहे. पुण्यातील व्यावसायिक नितीन शहा यांनी योगोपचार तज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना केल्यामुळे किडनी पुर्नरोपणानंतरही त्यांची कार्यक्षमता टिकून राहीली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
सतरा वर्षांपूर्वीे नितीन शहा यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ त्यांना डायलिसीस वर ठेवण्यात आले होते. दरम्यान आंतरराष्ट्रीय किर्तीचे योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद यांच्या संपर्कात शहा आले. त्यानंतर विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांनी योग उपचार सुरू केले. योगसाधनेमुळे शहा यांना मोठय़ा प्रमाणालर फायदा झाला आहे. आजही ते सोळा ते सतरा तास काम करू शकतात.
शहा हे सामाजिक कार्यातही सक्रीय आहेत. त्यांनी ‘रांका’, ‘ताराचंद’ व ‘आनंद ॠषी’ या रूग्णालयांना बारा डायलिसीस यंत्रे भेट दिली आहेत.