जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. अनिकेत साबळे असे या तरुणाचे नाव आहे. अनिकेतचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्या घरच्यांना याबद्दल माहिती झाल्यावर त्यांनी अनिकेतला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे घाबरूनच अनिकेतने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे.
दरम्यान, ही घटना घडल्यावर संबंधित मुलीचे नातेवाईक फरार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक नेमण्यात आले आहे.