पिंपरी-चिंचवडमधील तरूण व्यवसायिकाने १२ व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली आहे. व्यवसायात आलेल्या अपयशामुळे आणि कौटंबिक कारणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुशाग्र मनोज कंचन ( वय-३०) रा- वाकड असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. वाकड येथील डायनेस्टी सोसायटीच्या १२व्या मजल्यावरून कुशाग्रने उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहल्याची माहिती मिळाली आहे. ‘माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. मी तुमच्या गरजा पूर्ण शकलो नाही. तुम्ही आता टेंशन घेऊ नका मला माफ करा आणि माझी ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाखवा.’ असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे. त्यावरून कुशाग्रचे कुटुंबासोबत जमत नसल्याचा तर्क लावला जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुशाग्र व्यवसायातील चढ उतारामुळे आणि व्यक्तिगत कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत होता. तसेच त्याला फिट येण्याचा देखील आजार होता. या सर्वांमुळे आलेल्या नैराश्यातून आज मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुशाग्रने आत्महत्या केली.

मयत हा इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवण्याचा व्यवसाय करत होता. कुशाग्रचे कुटुंब झाशी येथे वास्तव्यास आहे. वाकड येथे कुशाग्रचा स्वतःचा फ्लॅट आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायात अपयश आल्यामुळे नैराशात गेलेला कुशाग्र तीन दिवसांपूर्वी येथे आला होता. कौटंबिक अडचण आणि व्यावसायातील अपयशामुले कुशाग्रने जीवन संपवल्याची समोर आले आहे.