News Flash

पुण्यात इंजिनिअर तरुणाची नोकरी गेल्याने गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने आत्महत्या

प्रतिनिधिक छायाचित्र

करोनामुळे लॉकडाउनमुळे कंपन्यांचे काम ठप्प झाल्याने मागील वर्षभरात लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशातच पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कावेरी पार्क सोसायटी कोंढवा येथे हा तरुण राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कावेरी पार्क सोसायटीमध्ये ऋषिकेश मारुती उमाप हा तरूण कुटुंबासोबत राहत होता. इंजिनिअर असलेला ऋषिकेशची लॉकडाउनमध्ये नोकरी गेली. त्यामुळे तो घरीच बसून होता. नोकरी नसल्याने, तो कायम चिंतेत होता.

दरम्यान, ऋषिकेश नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री त्याच्या रूममध्ये झोपण्यास गेला. मात्र सकाळी बराच वेळ होऊन देखील बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या रूममधील खिडकीतून घरातील व्यक्तीनी पाहिले असता ऋषिकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 12:48 am

Web Title: young engineer commits suicide by hanging himself after losing his job in pune abn 97
Next Stories
1 नुकसान सहन करण्याची ताकद राहिली नाही!
2 न झालेल्या करोनामुळे रिक्षाचालकाला भुर्दंड
3 पुन्हा टाळेबंदी नकोच, नुकसान सहन करण्याची ताकद राहिली नाही!
Just Now!
X