News Flash

पुण्यात तरुणाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील कात्रज येथील संतोषनगर येथे शुक्रवारी सकाळी धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चाणुर चमन खान (वय ३२  संतोषनगर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडी येथील पाण्याच्या टाकीच्या परिसरात मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी पोहोचल्यानंतर  चाणुर चमन खान याचा मृतदेह आढळला. त्याच्या कपाळावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 6:33 pm

Web Title: young man deth in weapon attack in pune
Next Stories
1 महसूल परिषदेत मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांची कानउघाडणी
2 शालेय विद्यार्थी वाहतुकीची रिक्षा पाच वर्षांनंतरही ‘भक्कम’ नाहीच
3 लोकजागर : केवढा हा निर्लज्जपणा!
Just Now!
X