08 March 2021

News Flash

पुण्यात तरुणाचा गोळ्या घालून खून

तिघांविरोधात गुन्हा दाखल, हल्लेखोर फरार

प्रतिकात्मक फोटो

पुण्यातील शाहू वसाहतीमध्ये एका तरुणाचा गोळ्या घालून आणि धारधार हत्याराने वार करून खून केल्याची घटना रविवारी रात्री  घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अमित मिलिंद सरोदे (वय 21) रा. जनता वसाहत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आदर्श ननावरे, यशवंत कांबळे आणि आणखी एक जण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, अमित मिलिंद सरोदे हा रविवारी रात्रीच्या सुमारास शाहू वसाहतीमधील एका दुकाना जवळ थांबला होता. त्यावेळी आदर्श ननावरे, यशवंत कांबळे आणि आणखी एक जण अशा तिघांनी अमितवर गोळ्या झाडल्या.  त्यानंतर त्याच्यावर धारधार हत्यारानं अनेक वार देखील करण्यात आले. या घटनेत अमितचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्या तिन्ही आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे दत्तवाडी पोलिसाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 10:00 am

Web Title: young man shot dead in pune msr 87 svk 88
Next Stories
1 पुणेकर इंजिनिअरला १.९२ लाखांचा गंडा, युरोपात नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक
2 आयसिसचे दहशतवादी असल्याच्या संशयावरून पुण्यात दोघांना अटक
3 पुण्यात खरेदीसाठी झुंबड
Just Now!
X