News Flash

प्रेमप्रकरणातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार

प्रेमप्रकरणातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना देहूरोड भागात घडली.

Deadly attack on youth in Nashik : या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रेमप्रकरणातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना देहूरोड भागात घडली. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

शुभम राजेंद्र तरस (वय २१, रा. विकासनगर, देहूरोड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अरुण हासतोडिया आणि दादया  होळकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पसार झालेल्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. शुभमचा भाऊ मयूर याने यासंदर्भात देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे आरोपीच्या नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे आरोपी त्याच्यावर चिडले होते. मंगळवारी (१५ नोव्हेंबर) रात्री विकासनगर भागात आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केले तसेच त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या शुभमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:03 am

Web Title: young man stabbed with sharp weapons for love affair
Next Stories
1 खाऊखुशाल : रामनाथ
2 पं. बबनराव हळदणकर यांचे निधन
3 डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल