News Flash

बावधन येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

बावधन येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांस अटक केली आहे.

| September 28, 2013 02:37 am

बावधन येथे किरकोळ कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांस अटक केली आहे.
लखन कुंदे तिरकी (रा. बावधन बु., ता. मुळशी) याचा खून झाला आहे. या खून प्रकरणी शाम लक्ष्मण पवार (वय ५५), राम शाम पवार (वय २३, रा. बावधन बु., ता, मुळशी) यांना अटक केली आहे. दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन याचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री चिकन सेंटरमधील कचरा टाकण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी डुक्कर आल्याचे दिसले. त्याने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी लखन हा नेहमीच डुक्कर पकडून घेऊन जातो असे म्हणून त्याला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी किसन खलखो (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीवरून हिंजवडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. ठेंगे करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:37 am

Web Title: youngster murder in bawadhan two arrest
टॅग : Arrest
Next Stories
1 नगरसेवकाने मारली अधिकाऱ्याच्या थोबाडीत
2 नदीकडेची पंचाहत्तर एकर जमीन शासनाकडून निवासी
3 संजय दत्तच्या सहभागाचा कैद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पुढे ढकलला
Just Now!
X