News Flash

संगणक अभियंता मैत्रिणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विंकल आणि तिचा मित्र नीलेशसिंग हे दोघेही संगणक अभियंता आहेत.

पती-पत्नीच्या आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट

संगणक अभियंता मैत्रिणीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्विंकल जोगिंदरपालसिंग बंदेशा (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नीलेशसिंग सुरेंद्रसिंग परिहार (वय ३०, रा. झेनॉन अपार्टमेंट, वाकड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदरपालसिंग परिहार (वय ५६, रा.नाशिक) यांनी यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विंकल आणि तिचा मित्र नीलेशसिंग हे दोघेही संगणक अभियंता आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध होते.

नीलेशसिंग याने तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केल्याने ट्विंकलने वाकड येथील सुकासा सोसायटीतील सदनिकेत ४ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेशसिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी.एस.फड तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 3:03 am

Web Title: youth charged for encouraging friend to commit suicide
Next Stories
1 पुन्हा खाकीवर हल्ला, संशयित चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार
2 भाजपमध्ये असंतोष खदखदतोय – अजित पवार
3 संशोधन केंद्रातील संशोधकांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच निकाली काढू – रविशंकर प्रसाद
Just Now!
X