17 January 2019

News Flash

पुण्यात तरूणाचा दगडाने ठेचून खून, तिघा मित्रांना अटक

हे सर्व मित्र दारू पिण्यासाठी एकत्र आले होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

पुण्यातील धायरी येथे दारू पिताना जुन्या वादातून झालेल्या भांडणात तिघा मित्रांनी एकाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास गणेशनगर धायरी येथे घडली. या प्रकरणाती तिनही संशयितांना सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत बाळासाहेब पोकळे (वय २५, रा. धायरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील अभिजीत पोकळे आणि त्याचे तीन मित्र दारू पिण्यासाठी एकत्र आले होते. त्याचदरम्यान त्यांच्यात हमरीतुमरी झाली आणि जुन्या भांडणावरून वाद झाला. दारूच्या नशेत असलेल्या अभिजीतच्या मित्रांनी त्याला मारहाण केली व दगडाने ठेचून त्याचा खून केला. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी त्वरीत हालचाली करून तिघा संशयितांना अटक केली. विशाल सेवकानंद वाघ, विकास विश्वनाथ पोकळे आणि सुधीर श्रीमंत घुगे असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस पुढल तपास करत आहेत.

First Published on February 12, 2018 9:47 am

Web Title: youth murdered by friend in pune