26 February 2021

News Flash

पुण्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून

सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या हत्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. या खूनाचा तपास अलंकार पोलिस करीत आहे. सिद्धार्थ कलवडी (वय २५, रा. लक्ष्मीनगर वसाहत, गल्ली नंबर ३, डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील डहाणूकर कॉलनीतील लक्ष्मीनगरमध्ये सिद्धार्थ कलवडी या तरुणावर सोमवारी रात्री राहुल सरकारसह तीन ते चार जणांनी कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात सिद्धार्थ गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळील रूग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोणत्या कारणावरून हत्या झाली आहे हे अद्याप पर्यंत समजू शकले नसून संशयित आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 8:56 am

Web Title: youth murdered in punes karvenagar area
Next Stories
1 राज्यातील गारठय़ात पुन्हा वाढ
2 चांद्रयान-२ या मोहिमेतून नावीन्यपूर्ण विज्ञान उलगडेल!
3 शिवाजीराव आढळराव यांच्यापुढे यंदा मोठे आव्हान!
Just Now!
X