वारजे परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (१० जून) रात्री घडली. हल्लेखोरांनी तरुणाचा खून केल्यानंतर त्याच्याकडील रोकड असलेली पिशवी आणि सोनसाखळी चोरल्याचे उघड झाले आहे. खुनामागचे कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बजरंग सीताराम भरम (वय ३५, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रक रणी हल्लेखोरांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग भरम याचा मोठा भाऊ विलास (वय ४१) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ टोळीतील गुंड बाबुलाल मोहोळ याचा बजरंग मेहुणा आहे. त्याचे कोणाशी भांडण नव्हते. तो रिक्षाचालक होता. बजरंग भिशीचे पैसे गोळा करण्याचे काम देखील करत होता. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून निघाला होता. गणपती माथा परिसरात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले आणि तीक्ष्ण शस्त्राने वार केले. बजरंग याचा मृत्यू झाला. पसार होण्यापूर्वी हल्लेखोरांनी त्याच्याकडील रोकड असलेली पिशवी आणि सोनसाखळी चोरली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेले चित्रीकरण पडताळण्यास सुरुवात केली आहे. पूर्ववैमनस्यातून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.

gangster fired on police during chasing
मुळशीतील मुठा गावात थरार ; गुंड नवनाथ वाडकरकडून पोलिसांवर गोळीबार
rain in Sangli and the northern parts of Tasgaon
सांगली, तासगावात पावसाने दिलासा
Father death Ranjan Pada Alibag Taluka
रायगड : रागाच्या भरात मुलाने केलेल्या मारहाणीत बापाचा मृत्यू, अलिबाग तालुक्यातील रांजण पाडा येथील घटना
three year old boy dies after balloon gets stuck in throat in Ichhalkaranji
फुगा घशात गेल्याने चिमुकल्याच्या मृत्यू; इचलकरंजीतील घटना