News Flash

पोलीस होण्याच्या इच्छेपोटी टोपी आणि बक्कल चोरले

पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणाला परीक्षेत अपयश आले.

पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असलेल्या तरुणाला परीक्षेत अपयश आले. पोलिसांसारखा गणवेश करून रुबाबात फि रावे, अशी इच्छा त्याने बाळगली होती. मात्र, परीक्षेत अपयश आल्याने त्याचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले. त्यानंतर पोलीस मुख्यालयातून त्याने पोलिसाची टोपी आणि बक्कल क्रमांक चोरला. पुणे-सातारा रस्त्यावर पोलिसांसारखा वेश परिधान करणाऱ्या त्या तरुणाची माहिती सहकारानगर पोलिसांना  मिळाली आणि तो पकडला गेला..

राहुल सुभाष जगताप (वय ३१, रा. डाळज, इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस शिपाई चव्हाण यांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्याला पोलीस दलाविषयी आकर्षण आहे. गेल्या वर्षी पुणे पोलीस दलात झालेल्या भरतीप्रक्रियेत तो सहभागी झाला होता. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या आवारात बेग यांचे पोलिसांच्या गणवेशासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रीचे दुकान आहे. तेथे बेग यांनी पोलीस शिपाई संदीप गायकवाड यांच्या बक्कल क्रमांकाला रंग लावून तो वाळत ठेवला होता. त्याने बक्कल क्रमांक आणि टोपी चोरली. पुणे-सातारा रस्त्यावर बालाजीनगर परिसरात रविवारी (८ जानेवारी) जगताप पोलिसांची टोपी घालून फिरत होता. सहकारनगर पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस हवालदार ए. व्ही. सोनवणे तपास करत आहेत. जगतापने पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक केली का? या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 3:39 am

Web Title: youth stolen police hat and and belt for fleeing cops
Next Stories
1 जगताप-पानसरे यांचे ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
2 ‘डीआरडीओ’कडून तात्पुरता पूल तंत्र विकसित
3 नवजात अर्भकांची विक्री?
Just Now!
X