News Flash

पुणे : महिलांच्या अंगावर रंगीत फुगे फोडणाऱ्या तरुणांची धुळवड पोलीस ठाण्यात

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अशा ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

हुल्लडबाजी करीत महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या तरुणांची धुळवड आता वाकड पोलीस ठाण्यात होणार आहे. या हुल्लडबाज तरुणांना वाकड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करीत असताना चौकामध्ये ये-जा करणाऱ्या महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाचा उद्योग काही तरुण करीत होते. दुचाक्या दमटतं ही मुलं हुडल्लडबाजी करीत होती.

गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी अशा ८४ तरुणांना ताब्यात घेतलं आहे, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी वाकड पोलिसांनी ९ पथकं तयारी केली होती. यामध्ये ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी सहभागी होते. आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांना आज दिवसभार पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याकडील चारचाकी आणि दुचाकी वाहनं देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:42 pm

Web Title: youths who burst colorful bubbles on womens arrested
Next Stories
1 Holi 2019 : विशेष मुलांकडून पुण्यात मनसोक्त रंगांची उधळण
2 बोलण्यापेक्षा माझा कामावर जास्त भर; ट्रोलर्सना पार्थ पवारांचे प्रत्युत्तर
3 पुण्यात दोन चिमुरडींवर ज्येष्ठ नागरिकाकडून लैंगिक अत्याचार
Just Now!
X